केंद्रीय जलसंधारण मंत्री श्री. सर्वानंद सोनोवाल यांची भेट घेतली व त्यांना निवेदनाद्वारे लवकरात लवकर हे काम सुरू करण्यासाठी विनंती केली. त्यावर केंद्रीय जलसंधारण मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना जेटीच्या कामाला सुरुवात तात्काळ होण्याकरिता मंजुरी देऊन अनुदान वर्ग करण्यात यावा असे आदेश दिले. ह्या मार्गावर जलवाहतुकीची सेवा उपलब्ध करुन दिल्यास वाहतुक कोंडी कमी होण्यास मदत होईल. तसेच किनारपट्टीवरील नागरीकांना पर्यटकांना याचा मोठा फायदा होऊ शकतो, स्थानिकांना रोजगाराची संधी उपलब्ध होऊ शकते. तरी सदर जलवाहतुकीच्या प्रकल्पास सागरमाला योजनेअंतर्गत मंजुरी देऊन निधी उपलब्ध करुन द्यावा जेणेकरून या प्रत्यक्षात कामास लवकरात लवकर सुरुवात होऊ शकेल. यासाठी आपण खात्याचे प्रमुख असल्याने आपल्या संबंधित विभागाला काम सुरू करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आदेश द्यावेत ही नम्र विनंती मंत्री महोदयांना पत्राद्वारे केली आहे.

Your email address will not be published.