माझ्या ठाणे लोकसभा मतदारसंघातील मीरा भाईंदर महानगरपालिकेतील नगरसेवकांच्या प्रभागातील प्रलंबित कामे मार्गी लागावी यासाठी काही दिवसांपूर्वी मीरा-भाईंदर आयुक्त दिलीप ढोले यांच्या दालनात बैठक आयोजित करण्यात आली केली होती.
नगरसेवकांना प्रभागातील विकास कामांसाठी निधी आवश्यक असलेली कामे मार्गी लावण्यासाठी यावेळी आयुक्त महोदयांसोबत सोबत चर्चा झाली. पावसाळ्यापूर्वी नाले सफाई, एसटीपी पंप हाऊस यांची दुरुस्ती तातडीने करून घ्यावी तसेच या पावसाळ्यात ड्रेनेज लाईन, पाण्याची लाईन या कामांना प्राधान्य देऊन ही कामे अधिकाऱ्यांकडून तातडीने मार्गी लावावीत तसेच डम्पिंग ग्राउंड येथे साठलेल्या कचऱ्याची विल्हेवाट जलद गतीने लावावी अशी विनंती यावेळी आयुक्तांना करण्यात आली होती. आज या कामांचा आढावा घेण्यासाठी पुन्हा एकदा आयुक्त महोदयांच्या दालनात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी या बैठकीस माझ्यासोबत आयुक्त दिलीप ढोले, आमदार गीता जैन, जिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे, उपजिल्हाप्रमुख संदीप पाटील, विरोधी पक्षनेते प्रवीण पाटील ,माजी विरोधी पक्षनेते राजू भोईर शिवसेना नगरसेवक दिनेश नलावडे ,धनेश पाटील, तारा घरत , जयंतीलाल पाटील, अश्विन कसोदिया ,शर्मिला बगाजी तसेच अधिकारी उपायुक्त अजित मुठे, उपायुक्त मुख्यालय विजय कुमार म्हसाळ ,शहर अभियंता शिवाजी बारकुंड, गायकवाड साहेब, सुरेश वाकोडे, दीपक खांबित व इतर अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच शहर प्रमूख लक्ष्मण जंगम, महिला उपशहर संघटक तेजस्वी पाटील व इतर शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.