मीरा भाईंदर मधील महापालिकेसाठी काम करीत असणाऱ्या सैनिक सिक्युरिटी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने त्यांच्या कर्मचाऱ्यांना कोणत्याही प्रकारची आगाऊ सूचना न देता नोकरीवरून काढून टाकण्यात आले होते. या कर्मचाऱ्यांनी या संदर्भात माझी भेट घेऊन सदर विषयाची मला माहिती दिली. याच पार्श्वभूमीवर आज या कामगारांना परत रुजू करण्यासाठी आयुक्त महोदयांच्या दालनामध्ये कर्मचाऱ्यांच्या उपस्थिती मध्ये बैठक घेतली व सदर विषयाबाबत सविस्तर चर्चा केली. आयुक्त महोदयांनी देखील लवकरच या कर्मचाऱ्यांना कामावर पुन्हा रुजू केले जाईल असे आश्वासन या बैठकी दरम्यान दिले.