शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव जी ठाकरे साहेब ह्यांच्या आदेशानुसार आणि शिवसेना नेते पालकमंत्री नामदार एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ठा.म.पा. प्रभाग क्र १२ मध्ये आज माझे गाव-करोना मुक्त गाव अभियान राबविण्यात आले.
प्रत्येक शाखाप्रमुखाने त्यांच्या वॉर्डात कोरोना लसीकरण, कोरोना काळात देण्यात आलेले मोफत रेशन, रिक्षा धारकांचे रजिस्ट्रेशन, विविध शासकीय योजना, वार्डात विविध समस्या असे काही महत्त्वाचे गोष्टींचा लोकांपर्यंत जाऊन आढावा घ्यावा शिवसैनिकाने सर्व सामान्य माणसाचे हित, त्यांच्या समस्यांचे निराकरण आणि विकासाभिमुख वाटचाल करत शहरातील प्रत्येक माणसांशी जोडले गेलो तर प्रत्येक क्षेत्रात आपले खरे स्वबळ निर्माण होईल. यासोबतच शहरात आपले चालू असलेलं विकासकामांनी संघटन ही अधिकच मजबूत होईल.
यावेळी जिल्हा प्रमुख व ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के साहेब, शहर प्रमुख हेमंत पवार, नगरसेविका नंदिनी विचारे, रुचिता मोरे, विभाग प्रमुख राम काळे, अप्पा देशमुख, संजय सोनार, राजेश मोरे, मिलिंद मोरे मान्यवर उपस्थित होते