आज माझ्या मतदारसंघातील ठाणे महापालिकेमार्फत उभे राहिलेल्या संत गजानन महाराज चौक, राम मारुती रोड, नौपाडा येथे वारकरी भवनाच्या इमारतीचे "देवशयनी आषाढी एकादशीचे" औचित्य साधून वारकरी भवनाचे उद्घाटन पालकमंत्री सन्माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब व ठामपा महापौर नरेशजी मस्के यांच्या शुभहस्ते पार पडले. या उद्घाटन प्रसंगी ह. भ. प. गुरुवर्य श्री. माधव महाराज घुले मठाधिपती इगतपुरी यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास उपमहापौर पल्लवी पवन कदम, स्थायी समिती सभापती संजय भोईर, सभागृह नेते अशोक वैती, गटनेते दिलीप बारटक्के, परिवहन सभापती विलास जोशी, ठाणे जिल्हा महिला आघाडी मीनाक्षी शिंदे, महिला संघटक वंदना डोंगरे, स्मिता इंदुलकर, नगरसेविका नंदिनी विचारे, मालती रमाकांत पाटील, प्रियांका अविनाश पाटील, पद्मा यशवंत भगत, प्रभा बोरीटकर, नगरसेवक नरेश मणेरा, प्रकाश शिंदे, भूषण भोईर, नरेंद्र सूरकर, गणेश कांबळे, परिवहन समिती सदस्य राजेश मोरे, माजी नगरसेवक विलास सामंत, भास्कर पाटील, मंदार विचारे, श्री संत शिरोमणी ज्ञानेश्वर माऊली सेवा मंडळ ठाणे चे अध्यक्ष श्री. दिनकर पाचंगे, ज्येष्ठ नागरिक संघ मध्यवर्ती समिती ठाणे चे अध्यक्ष आसावरी फडणीस, उपाध्यक्ष प्रकाश दिघे, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद ठाणे शाखेचे प्रमुख कार्यवाहक नरेंद्र बेडेकर, वारकरी संप्रदायातील माउली सेवा मंडळ ठाणे व विश्व वारकरी सेना ठाणे जिल्हाध्यक्ष विलास फापाळे आणि वारकरी, इतर शिवसेना व युवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे स्वप्न आज पूर्ण झाले त्याबद्दल मला खरंच मनापासून समाधान आहे. येत्या काळात या वारकरी भवनाच्या माध्यमातून अधिकाधिक धार्मिक रूढी व परंपरा जोपासण्याचे काम मोठ्या प्रमाणावर होईल अशी मला आशा आहे.

Your email address will not be published.