आज माझ्या खासदार निधीतून ठा.म.पा. प्रभाग क्र. २१ मधील शिवाजी नगर, बी कॅबीन, नौपाडा येथे गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब ज्येष्ठ नागरिक कट्ट्याचा लोकार्पण सोहळा महापौर श्री. नरेश म्हस्के साहेब यांच्या हस्ते संपन्न झाला.
ज्येष्ठ नागरिकांनी केलेल्या विनंती नुसार नौपाड्यातील शिवसैनिक, शाखाप्रमुख मधुकर गिजे व रमेश शिर्के ज्येष्ठ नागरिक कट्टा बांधण्याकरिता खासदार निधी उपलब्ध करून द्यावा अशी विनंती केली होती. आज याच पार्श्वभूमीवर येथील ज्येष्ठ नागरीक कट्याचा लोकार्पण सोहळा पार पडला. त्यावेळी उप महापौर सौ. पल्लवी कदम, गटनेते दिलीप बारटक्के, स्थायी समिती सभापती संजय भोईर, शहर प्रमुख हेमंत पवार, माजी नगरसेवक भास्कर पाटील, हिराकांत फर्डे, मंदार विचारे, विभाग प्रमुख प्रकाश पायरे, उप विभाग प्रमुख किरण नाकती, प्रीतम रजपूत, मधुकर गिजे, बाळा गवस, शाखाप्रमुख रमेश शिर्के, प्रकाश सावंत, मनोज ठाकूर, वसंत कोंडभर, बाळू खानेकर, उप शाखाप्रमुख विजय डावरे, संजय बोराडे, पप्पू गवस, बजरंग हातेकर, राकेश साळुंखे, ठाणे ज्येष्ठ नागरिक संघ मध्यवर्ती समितीचे उपाध्यक्ष प्रकाश दिघे, जितेश भुवड, गटप्रमुख राजन दळवी, महिला आघाडी नौपाडा अध्यक्ष शर्मिला नेवाळकर, गटप्रमुख सुरेखा भोसले, मनीषा शिंदे, मेघा निकम, भारती शिर्के आणि समस्त शिवसैनिक, पदाधिकारी इत्यादी उपस्थित होते.