Shri Rajan Vichare's website. Shivsena - BJP candidate from Thane-148 constituency.
मुखपृष्ठ  |  मनोगत  | पुरस्कार  |  झालेले प्रकल्प  |  महत्त्वाकांक्षी प्रकल्प  |  आव्हाल  |  बातम्या  |  लोकसभेतील कामकाज  |  प्रेरणास्थान  |  संघ्र  |  संपर्क
सॅटीस
ठाणे शहरातील वाहतुकीला कंटाळलेल्या नागरिकांना दिलासा देणारा सॅटीस...
अधिक वाचा
पाणी पुरवठा योजना
अतिरिक्त 110 द.ल.लि. प्रतिदीन पाणी पुरवठा योजना...
अधिक वाचा
मुंबई विद्यापीठाचे उपकेंद्र
बाळकुम येथे मुंबई विद्यापीठाचे उपकेंद्र सुरू करण्यात आले.
अधिक वाचा
 
महानगर पाइप गॅस
ठाणे शहरात महानगर पाइप गॅसचे कनेक्शन
अधिक वाचा
विकास ठाण्याचा...विचार ठाणेकरांचा

बऱ्याच वेळा विकास म्हणजे पालिकेने किती रस्ते बांधले, पाण्याच्या किती जोडण्या दिल्या, किती गटारे बांधली, किती दुरूस्त केली वगैरे वगैरे अशी बहुतेक जणांची कल्पना असते, नव्हे आहेच. या पलीकडे काही विकास असतो हे सहसा लोक मान्यच करायला तयार नसतात. पण खऱ्या अर्थाने विकासाची ही व्याख्या सामाजिक आणि सांस्कृतिक समृद्धीशिवाय अपुरी आहे हे समजून घ्यायला हवं. विकासाचं प्रतिबिंब हे विविध मार्गानी प्रतिबिंबित व्हायला हवं. नेमक्या याच दिशेने मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी ठाणे महापालिकेच्या माध्यमातून वाटचाल केली, ज्या वाटचालीतूनच ठाणे शहराच्या विकासाला नवी गती प्राप्त झाली.

   

नागरिकांना मूलभूत गरजा पुरविणे ही महापालिकांची, शासनाची जबाबदारी आहे हे मान्य करून नागरिक, स्थानिक स्वयंसेवी संस्था यांच्या सहभागाशिवाय ही जबाबदारी पार पाडणे शक्य होणार नाही हे ओळखूनच नागरिक, स्थानिक स्वयंसेवी संस्था, लोकप्रतिनिधी यांच्या समन्वयातून आणि सहभागातून आम्ही विकासाचा नवा पायंडा पाडला आहे असे म्हटल्यास ती अतिशयोक्ती ठरणार नाही.

हे शहर पायाभूत सुविधांच्याबाबतीत आंतरराष्ट्रीय पातळीवर अग्रगण्य ठरावं, औद्योगिक विकासाबरोबरच पर्यावरणाभिमुख शहर म्हणून या शहरची गणना व्हावी यासाठी महापालिकेने केलेली कामगिरी राष्ट्रीय स्तरावरही गौरविली गेली आहे. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महापालिकेच्या माध्यमातून अलीकडच्या काळात आम्ही अनेक महत्वाकांक्षी निर्णय घेतले. त्यामध्ये माहिती तंत्रज्ञान उद्योगांना निवासी दराने कर आकारणी करण्याचा निर्णय महत्वाचा आहे. औद्योगिकदृष्ट्या ठाणे शहराचा चौफेर विकास झाला आहे ही वस्तुलस्थती आहे. परंतु या शहरात माहिती तंत्रज्ञान उद्योगांची वाढ म्हणावी तशी झाली नव्हती. त्यामुळे माहिती तंत्रज्ञान उद्योगाचा विकास करून हे शहर सर्वांगीण विकासाच्यादृष्टीने विकसित करण्यासाठी हा निर्णय महत्वपूर्ण ठरला आहे यात शंका नाही.

 

पर्यावरणाच्या बाबतीत तर ठाणे महापालिकेने केलेले कार्य राष्ट्रीय पातळीवर गौरविले गेलेले आहे. ठाणे शहर पर्यावरणाभिमुख शहर किंवा इको फ्रेंडली शहर बनविण्यासाठी महापालिकेने ग्रीन बजेट तयार करण्यापासून अनेक महत्वाचे निर्णय घेऊन पर्यावरणाभिमुख विकासाच्यादृष्टीने महत्वाची पावले उचलली आहेत. वायू प्रदूषणाचा धोका ओळखून महापालिकेने परिवहन सेवेतील बसेसना सी.एन.जी. किटस् बसविण्याचा निर्णय घेतला. त्याचप्रमाणे नवीन खरेदी केलेल्या 50 बसेसपैकी 25 बसेस या सी. एन.जी. वर चालणाह्रया आहेत. यामुळे महापालिकेने नागरिकांचा प्रवास अधिक सुकर करण्याचा प्रयत्न केला.

सौर ऊर्जेच्या वापराच्याबाबतीत ठाणे महापालिकेने केलेल्या अनन्यसाधारण कामगिरीचा गौरव केंद्रीय अपारंपारिक ऊर्जा मंत्रालयानेही केला आहे. सौर ऊर्जेमध्ये महापालिकेने केलेल्या कार्याची दखल घेऊन केंद्रीय अपारंपारिक ऊर्जा मंत्रालयाने राष्ट्रीय पातळीवरील चर्चासत्राचे आयोजन करण्याची जबाबदारी ठाणे महापालिकेवर सोपविली. या चर्चासत्रामध्ये देशभरातील सर्व महापालिकांचे आयुक्त आणि प्रतिनिधी उपलस्थत होते. त्याचप्रमाणे सौर ऊर्जेचा व्यापक प्रमाणात वापर केला जावा यासाठी महापालिका सातत्याने आग्रही राहिली आहे. खास करून विकास नियंत्रण नियमावलीमध्ये सुधारणा करून सौर ऊर्जेवर आधाय्रत पाणी गरम करण्याचे यंत्र बसविणे बंधनकारक करणारी ठाणे महानगरपालिका ही देशातील एकमेव महापालिका आहे. त्याचप्रमाणे जुन्या इमारतींवर ही यंत्रणा बसविणाऱ्यांना 10 टक्के मालमत्ता करात सवलत योजना जाहीर केली. कळवा हॉस्पिटल येथे सौर ऊर्जेवर पाणी गरम करण्याची यंत्रणा कार्यान्वित करण्यापासून रस्त्यावरील सिग्नल्स आणि रोड ब्लींकर्सही सौर ऊर्जेवर चालावेत यासाठी महापालिकेने प्रायोगिक तत्त्वावर काम करण्यास सुरूवात केली आहे. यामुळे किमान 25 टक्के वीज बचत होण्यास मदत झालीच पण वीज बिलात करोडो रूपयांची बचत झाली. महापालिकेच्या या उपक्रमाची राष्ट्रीय पातळीवर दखल घेऊन पालिकेला या वर्षीचा राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. शहरातील ओल्या कचऱ्यापासून गॅस निर्मिती करणारा बायोमिथनायझेशनचा प्रकल्पही एक नावीण्यपूर्ण प्रकल्प म्हणून गणला गेला आहे. शहरामध्ये रोज गोळा केल्या जाणाऱ्या ओल्या कचऱ्याचा वापर या प्रकल्पामध्ये करून गॅस निर्मिती करण्यात येते. आजमितीस या प्रकल्पासाठी रोज 40 टन ओल्या कच-याचा वापर होतो. त्याचबरोबर खारफुटीच्या झाडांचे वृक्षारोपण करण्यापासून ते अलीकडेच शहरांमधील सर्व शाळांमध्ये एक विद्यार्थी एक रोप ही मोहीम राबविण्यात आली. या मोहिमे अंतर्गत शहरांमधील सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या हस्ते सुमारे 24 हजार झाडे लावण्यात आली. महापालिकेने राबविलेले असे अनेक उपक्रम पर्यावरणाच्यादृष्टीने महत्वाचे ठरले आहेत.

 

मालमत्ताधारकांना विम्याचे संरक्षण देण्याचा पालिकेचा निर्णय तसा नावीण्यपूर्णच म्हणायला हवा. या निर्णयामुळे गोरगरीब लोकांना मोठा आधार मिळणार आहे. जे मालमत्ता धारक 31 जानेवारी 2006 पूर्वीपर्यंत आपले कर भरतील त्यांना विमा संरक्षणाचा लाभ मिळणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी सुरू आहे. सिद्धेश्वर तलाव येथील झोपड्यांचे पुनर्वसन करण्याचा सामाजिक कर्तव्य भावनेतून घेतलेला निर्णयही तितकाच महत्वाचा आहे. या संदर्भात महापालिकेने सदर जागेवरील आरक्षण बदलाचा ठराव मंजूर करून तो शासनाकडे मान्यतेस्तव पाठविला आहे.

खऱ्या अर्थाने महापालिकेची कसोटी लागली ती 26 जुलै रोजी झालेल्या महाप्रलयकारी पावसाच्या वेळी. या पावसात निसर्गाने होत्याचे नव्हते केले. अनेकांचे संसार वाहून नेले. अनेकांना देशोधडीला लावले. अख्खी मुंबई पाण्याखाली श्वास घेत असताना ठाणे त्याला कसे अपवाद ठरेल? 26 जुलैच्या महाप्रलयकाली पावसाने ठाण्यातील 32 नागरिकांचा बळी घेतला. करोडो रूपयांचे नुकसान केले. पण महापालिकेने आपले उत्तरदायित्व नाकारले नाही. कोणालाही वाऱ्यावर सोडले नाही. सगळयांना मदतीचा हात दिला. सगळयांचे अशू पुसण्याचा प्रयत्न केला. महापालिकेने यासाठी 5 कोटी रुपयांची विशेष तरतूदही केली. त्यातील अडीच कोटी रूपयांची तरतूद जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी आणि अडीच कोटी रूपयांची तरतूद ही इतर नागरी सुविधा पुरविण्यासाठी करण्यात आली. महापालिकेने केलेली ही मदत केवळ कर्तव्य भावनेतूनच केलेली आहे. यावर्षीही पावसामध्ये निर्माण होणाऱ्या आपत्कालीन परिलस्थतीचा सामना करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी तयारी केली होती.

शहराचा पायाभूत विकास करण्याच्या उद्देशाने शहरातील रस्ते सिमेंटकाँक्रिटचे बांधण्याचा महत्वाकांक्षी निर्णय घेतला आणि त्याची अंमलबजावणीही केली. आजमितीस पालिकेने शहरामध्ये 24.5 कि.मी. लांबीचे सिमेंट काँक्रिटचे रस्ते बनविले आहेत. कळवा मुंब्रा रस्त्याचे डांबरीकरण, अविकसित भागाच्या विकासासाठी विशेष तरतूद आदी अनेक महत्वापूर्ण कामेही मार्गी लागली आहेत.

या शिवाय नागरिकांना जास्तीत जास्त सुविधा देण्याच्या दृष्टिकोनातून वागळे इस्टेट परिसरात स्वतंत्र सायकल लेन निर्माण करणे, अंध विद्यार्थ्यांसाठी शाळा बांधणे, रेल्वे स्टेशन परिसर सुधारणा प्रकल्प हाती घेणे, झोपडपट्टी तिथे नळ योजना आदी महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. आर्थिक शिस्त आणि लेखा पद्धतीमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी अवलंबिलेली डबल एंट्री लेखा पद्धतही नावीन्यपूर्ण ठरली. या सर्व निर्णयांच्या मुळाशी या शहराचा विकास हेच एकमेव तत्त्व होते.

तलावांचं संवर्धन आणि सुशोभिकरण प्रकल्प हा या शहराच्या इतिहसातील महत्वपूर्ण टप्पा. या शहरला निसर्गाने एक नव्हे दोन नव्हे तब्बल 35 तलावांचं दान दिलं. पण काळाच्या ओघात नागरीकरणाच्या तडाख्यात ही तलावांची ओळख इतिहासजमा होण्याच्या मार्गावर होती. तलावांचं शहर असलेल्या या शहराची ही जुनी ओळख परत मिळवून देण्याच्या कामी महापालिकेने हाती घेतलेला शहरातील निवडक 12 तलावांच्या संवर्धन आणि सुशोभिकरणाचा प्रकल्प महापालिकेची राष्ट्रीय स्तरावर ओळख निर्माण करून द्यायला कारणीभूत ठरला. या निमित्ताने महापालिकेने पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि तलावांचे प्रदूषण रोखण्यासाठी कृत्रिम तलावांची निर्मिती करून जनतेने त्या तलावात श्री मूर्तीचे विसर्जन करावे यासाठी पुढाकार घेतला. गणेश विसर्जनाची पर्यायी व्यवस्था म्हणून पालिकेने मुंब्रा येथे विसर्जन घाटही बांधला.

महत्वाकांक्षी प्रकल्पांमध्ये उल्लेख करण्याजोग्या महत्वाच्या आणि शहराच्या नागरीकरणाची समस्या सोडविण्यास साहायिभूत ठरणाऱ्या प्रकल्पामध्ये 450 कोटी रूपयांच्या मल:निसारण प्रकल्पाचा समावेश आहे. असे कितीतरी निर्णय महापालिकेने घेतले की ज्या निर्णयांमुळे ठाणे शह्रात सुधारणेचा आणि विकास कामांचा नवा अध्याय सुरू झाला आहे. या शहराचा राष्ट्रप्रेमाचा वारसा पुढे चालविताना शहिद मेजर मनीष पितांबरे यांचे स्मारक उभारण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबीयांना पाच लाख रूपयांची मदत आणि त्यांच्या पत्नीला नोकरी देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे त्याची अमंलबजावणी झाली आहे. ठाणेकर नागरिकांना अभिप्रेत असलेल्या विकासाची संकल्पना राबवितांना मायबाप नागरिकांचे आशीर्वाद पाठीशी असावेत यासाठीच हा कार्य अहवालाचा प्रपंच.

ठाण्याच्या जडणघडणीत शिवसेनेचे योगदान

मा. शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे यांचे ठाण्यावरील प्रेम सर्वशुत आहे. ठाणे शहरला शिवसेनेने अनेक बिनीचे शिलेदार दिले आहेत. ठाण्याचे महापौरपद भूषविण्याचा पहिला मान शिवसेनेला मिळाला. ठाणे महानगरपालिकेच्या सभागृह नेतेपदीही शिवसेनेतर्फे अनेक मान्यवर विराजमान झाले आहेत. कै. श्री. खासदार मा. श्री. प्रकाश परांजपे यांची सभागृह नेतेपदाची कारकीर्द खूपच गाजली. त्याचप्रमाणे नगरसेवक श्री. विलास सामंत, श्री. गोपाळ लांडगे, श्री. एकनाथ शिंदे यांनी ठाणे महानगरपालिकेचे सभागृह नेतेपद भूषविले आहे.

शिवसेनेने ठाण्यातून अनुभवी लोकप्रतिनिधी महाराष्ट्राच्या विधिमंडळात पाठविले आहेत. आमदार कै. श्री. मो.दा. जोशी, श्री. सीताराम भोईर, आमदार श्री. अनंत तरे अशा लोकप्रतिनिधींनी महाराष्ट्राच्या विधिमंडळात ठाण्याचे प्रतिनिधित्व केले होते. विद्यमान आमदार व शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख श्री. एकनाथ शिंदे व लोकसभेत कै. श्री. खासदार श्री. प्रकाश परांजपे असे दिग्गज शिवसेनेतर्फे ठाण्याच्या विकासात सिंहाचा वाटा आहे.

महाराष्ट्रात शिवसेना भाजपा युतीचे सरकार जेव्हा सत्तारुढ झाले त्या कालावधीत तत्कालीन मुख्यमंत्री श्री. मनोहर जोशी यांनीही ठाण्याकडे विशेष लक्ष पुरविले. मा. शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणेच त्यांचा वारसा समर्थपणे चालय्वणारे शिवसेनेचे कार्याध्यक्ष मा. श्री. उद्धवजी ठाकरेसाहेब आम्हां सर्वांचे स्फूर्तिस्थान आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ठाण्याच्या जडणघडणीत शिवसेना भविष्यातही अग्रभागी राहील.

आपदग्रस्तांचे अश्रू पुसले

नैसर्गिक आपत्तींचं चक्र कोणालाही सुटलेले नाही. पण त्या परिस्थितीशी कसा सामना करायचा ही मात्र त्यापेक्षाही महत्त्वाची आणि सर्वस्वाचा कस लावणारी गोष्ट आहे. पण आम्ही प्रत्येकवेळी आमचे सर्वस्व पणाला लावून मदतीचा हात पुढे केला आहे याची साक्ष प्रत्येक ठाणेकर देईल.

गतसालातील सर्वात कटू घटना म्हणजे दि. 26 जुलै रोजी पडलेला महाप्रलयकारी पाऊस. निसर्गाचे एवढे क्रूर रूप यापूर्वी कधीही पाहायला मिळाले नव्हते तेवढे क्रूर रूप यावर्षी लोकांनी अनुभवले. या पावसात क्षणात होत्याचे नव्हते झाले. डोळयादेखत लोकांचे संसार वाहून जात होते. मुलं अनाथ होत होती. अनेकजण देशोधडीला लागत होते. या प्रलयकारी पावसामुळे अख्खी मुंबई पावसाच्या पाण्याखाली श्‍वास घेत असताना महामुंबईचाच एक भाग असलेलं ठाणे शहरी त्याला अपवाद राहिलं नाही.

या महाप्रलयकारी पावसाने ठाणे शहरातील 32 नागरिकांचा बळी घेतला. अनेकांचे संसार या पावसाने आपल्या पोटात घेतले, करोडो रुपयांचे नुकसान केले. सर्वत्र हाहा:कार उडाला होता. अशा या परिलस्थतीत आम्ही आपले उत्तरदायित्व नाकारले नाही. कोणालाही वाऱ्यावर सोडले नाही. सगळयांना मदतीचा हात दिला. सगळयांचे अश्रू पुसले आणि सगळयांच्या मागे निर्धाराने उभे राहिलो. रात्रं-दिवस राबून या शहराचा श्‍वास जिवंत ठेवला. नगरसेवक, अधिकारी, सामाजिक संस्था यांच्या मदतीने पावसाने लोकांचे उद्‌ध्वस्त झालेले संसार आम्ही उभे केले.

शहरावर कोसळलेल्या या आपत्तीची तीव्रता लक्षात घेऊन आपदग्रस्तांना मदतीचा हात देण्याच्या दृष्टिकोनातून, त्याला थोडाफार आधार देण्याच्या भूमिकेतून आम्ही 5 कोटी रूपयांची विशेष तरतूद केली. त्यातील अडीच कोटी रुपये हे त्यांना जीवनाश्यक वस्तूची खरेदी करण्यासाठी तर उर्वरित अडीच कोटी रुपयांची तरतूद ही पावसात नुकसान पोहोचलेल्यांना नागरी सुविधा पुरविण्यासाठी करण्यात आली. महापालिकेने केलेली ही मदत सहानुभूती नाही तर कर्तव्यभावनेतून केली आहे.

हीच कर्तव्यभावना आम्ही वेळोवेळी जपली आहे. चेना पुलावरून महापालिकेच्या परिवहन सेवेची बस नदीत कोसळून झालेल्या दुर्घटनेच्यावेळीही मदतीचा हात सर्वात आधी कोणी दिला असेल तर तो शिवसेनेनेच. महापालिकेच्या माध्यमातून जखमींच्या औषधोपचाराचा खर्च केलाच पण ज्यांनी आपले प्राण गमावले त्यांनाही आर्थिक मदत केली. मृतांच्या कुटुंबीयांना वाऱ्यावर सोडले नाही याचीही प्रचीती ठाणेकरांनी अनुभवली आहे. प्रश्न शहराच्या विकासाचा असो वा आपत्तीचा असो आम्ही आमचे सर्वस्व पणाला लावले आहे.

भविष्यातही राजकारण विरहित समाजकारण करण्याच्या उद्देशाने शिवसेना सतत कार्यरत असेल हि नि:संशय व वादातीत बाव आहे. शिवाय या निमित्ताने ठाणेकर नागरिकांची सेवा करण्याची सुवर्णसंधी आहे या दृष्टिकोनातूनच इथून पुढचा आमचा प्रवास राहणार आहे.

 
सिद्धेश्‍वर तलावाला नवी झळाळी
एकेकाळी ठाणे शहरात 65 तलाव होते. तलावांचे शहर म्हणून प्रसिद्ध असलेल्या ठाणे शहराच्या या ऐतिहासिक वारशांचे जतन करण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न गेली अनेक वर्षे ठाणे महानगरपालिका करीत आहे. याबाबत प्रशासनाबरोबरच लोकप्रतिनिधी आणि ठाणेकर जनता सतत प्रयत्नशील आहेत.

ठाण्यातील सिद्धेश्‍वर तलाव हा असाच एक महत्वाचा तलाव. त्याभोवती सुमारे 2200 झोपडीपट्टीधारक राहत असून या परिसरातील झोपडपट्टयांमध्ये सुमारे दहा हजार इतकी लोकसंख्या सामावलेली होती. येथे राहणाऱ्या तळागाळातील लोकांना ठाणे महानगरपालिकेने आजवर सर्व नागरी सुविधा पुरविल्या आहेत.

येथील रहिवाशी ठाणे महानगरपालिकेला नियमितपणे कर भरीत आहेत. तत्कालीन आयुक्त श्री. टी. चंद्रशेखर यांनी आपल्या कारकीर्दीत या तलावाभोवती संरक्षक भिंत उभी केली होती. मात्र या झोपडपट्टीची ड्रेनेज लाईन या तलावात गेल्यामुळे या तलावाचं डबकं झालं होतं. या परिसरातील झोपडपट्टीत एखादी मोठी आग लागली तर अग्निशमन दलाची गाडी आतही येऊ शकत नाही. त्यामुळे रहिवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. पावसाळयात तलावांच पाणी रहिवाशांच्या घरात शिरत असल्याने लोकांच्या निवासाची व आरोग्याची समस्या दिवसेंदिवस अधिकच बिकट व्हायची.

ठाण्यातील सिद्धेश्‍वर तलाव हा असाच एक महत्वाचा तलाव. त्याभोवती सुमारे 2200 झोपडीपट्टीधारक राहत असून या परिसरातील झोपडपट्टयांमध्ये सुमारे दहा हजार इतकी लोकसंख्या सामावलेली होती. येथे राहणाऱ्या तळागाळातील लोकांना ठाणे महानगरपालिकेने आजवर सर्व नागरी सुविधा पुरविल्या आहेत. येथील रहिवाशी ठाणे महानगरपालिकेला नियमितपणे कर भरीत आहेत. तत्कालीन आयुक्त श्री. टी. चंद्रशेखर यांनी आपल्या कारकीर्दीत या तलावाभोवती संरक्षक भिंत उभी केली होती. मात्र या झोपडपट्टीची ड्रेनेज लाईन या तलावात गेल्यामुळे या तलावाचं डबकं झालं होतं. या परिसरातील झोपडपट्टीत एखादी मोठी आग लागली तर अग्निशमन दलाची गाडी आतही येऊ शकत नाही. त्यामुळे रहिवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. पावसाळयात तलावांच पाणी रहिवाशांच्या घरात शिरत असल्याने लोकांच्या निवासाची व आरोग्याची समस्या दिवसेंदिवस अधिकच बिकट व्हायची. त्यामुळे येथील झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनाची आणि तलावांचं सौंदर्यीकरण करण्यासाठी आणि या प्रकरणाचा एकदाचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी या प्रभागाचे ज्येष्ठ नगरसेवक व महापौर श्री. राजन विचारे यांनी पुढाकार घेतला. 2200 झोपडपट्टीधारकांच्या पुनर्वसनासाठी सिद्धेश्‍वर तलाव परिसरातील जागा निवासी झोन करण्यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या या तलावाच्या गोषवाऱ्यातील 'सिद्धेश्‍वर तलाव बुजवून' या शऱ्दप्रयोगातील तांत्रिक चुकीमुळे 'जाग' या संघटनेचा गैरसमज झाल्याने या प्रस्तावाला विरोध करण्यात आला. हे प्रकरण जेव्हा मंगळवार दि. 20 जुलै 2004 रोजी मंजुरीसाठी महासभेत आले तेव्हा श्री. राजन विचारे यांनी या तांत्रिक चुकीवर प्रकाश टाकला आणि 'तलाव बुजवून' हा शब्द गोषवाऱ्यातून अखेर गाळण्यात आला. या झोपडपट्टीवासीयांच्या दृष्टीने हा प्रस्ताव अत्यंत जिव्हाळयाचा असल्यामुळे त्यांना या प्रस्तावाला काही लोक गैरसमजापोटी विरोध करीत असल्याचे समजताच त्या विरोधात ठाणे महानगरपालिकेवर महासभेच्याच दिवशी प्रचंड मोर्चा काढल्याने परिस्थिती बिकट होऊन वातावरण तणावग्रस्त झाले होते. अशा वेळी श्री. राजन विचारे यांनी सभागृह नेते श्री. एकनाथ शिंदे, आपल्या प्रभागातील स्थानिक नगरसेवक श्री. एकनाथ काजारी, श्रीमती स्नेहल सावंत, श्रीमती राजश्री शृंगारपुरे या स्वपक्षीय लोकप्रतिनिधींबरोबरच विरोधी पक्षांच्या लोकप्रतिनिधींसह सर्वांना विश्‍वासात घेऊन महासभेत या प्रकरणाला मंजुरी मिळविण्यात यश मिळविले. त्यामुळे गेली अनेक वर्षे भिजत पडलेली ही समस्या अखेर मार्गी लागली.

सिद्धेश्‍वर तलाव परिसरातील झोपडपट्टीधारकांनी सहा गृहनिर्माण संस्था स्थापिल्या असून विशेष म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत हे सर्व झोपडपट्टीधारक या योजनेसाठी पात्र ठरले आहेत. शासनाकडे मंजुरीसाठी पाठविली असतांना काही नागरिकांनी हायकोर्टात अपील केल्याने महाराष्ट्र शासनाने हि योजना नामंजूर केली. परंतू सोसायटी धारकांनी शासनाच्या निर्णया विरोधात हायकोर्टात अपील केल्याने आता मा. हायकोर्टाने त्याबाबत परत एकदा नियम 37 अन्वये कार्यवाही करुन हरकत सुचना मागवून योग्य तो निर्णय व्हावा अशी ऑर्डर काढली आहे. याबाबत कार्यवाही करुन या मंजूर सोसायटी धारकांचे नवीन घरांचे स्वप्न साकार होईल यासाठी शिवसेना-भाजपा आपल्यासाठी प्रयत्नशिल आहे. ही पुनर्वसन योजना राबविताना झोपडपट्टीधारकांच्या निवासाचा प्रश्न तर सुटलाच पण त्याचबरोबर सिद्धेश्‍वर तलावाचं सर्व बाजूंनी 20 फुटांनी विस्तारीकरण झालं त्यानंतरच झोपडपट्टीधारकांच्या निवासी इमारती उभारण्यास परवानगी देण्यात आली. त्यामुळे ठाण्यातील या ऐतिहासिक तलावाचं विस्तारीकरण, सुशोभिकरण, सौंदर्यीकरण करून पर्यायाने आपोआप पर्यावरणाचेही संवर्धन झालं. अशा प्रकारची मोलाची कामगिरी सर्वांच्या सहकार्याने ज्येष्ठ नगरसेवक श्री. राजन विचारे यांनी बाजावली आहे, यामुळेच सिद्धेश्वर तलावाच्या निमित्ताने ठाणे शहराच्या ऐतिहासिक सौंदर्यात भर पडणार आहे.

झोपडपट्टी पुनर्विकास योजना

महापालिकेने सामाजिक भावनेतून घेतलेल्या अनेक निर्णयांची अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील असून त्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला जास्तीतजास्त नागरी सुविधा मिळवून देण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न राहिला आहे. त्याच उद्देशाने आम्ही झोपडपट्टी पुनर्विकास योजना हाती घेण्याचा आणखी एक महत्वाकांक्षी निर्णय घेतला. या योजनेंतर्गत सिद्धेश्‍वर तलाव पाचपाखाडी व ठाणे पूर्व येथील झोपडपट्टींचे पुनर्वसन करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

उपरोक्त जागेवरील झोपडपट्टी पुनर्विकास योजनेचे काम तातडीने मार्गी लागावे म्हणून महापालिकेने या जागेवरील आरक्षण बदलाचा ठराव मंजूर करून अंतिम मान्यतेसाठी तो शासनाकडे पाठविला आहे. हया योजनेमुळे शहरातील हजारो झोपडपट्टीधारकांना त्यांच्या हक्काचे घर मिळण्यास मदत होणार आहे. या योजनेंतर्गत महापालिकेने आतापर्यंत 15 झोपडपट्टयांचे पुनर्वसन केले आहे.

झोपडी तिथे नळ

महापालिकेने आपली सामाजिक बांधिलकी अधिक दृढ करताना झोपडपट्टी तिथे नळ ही आणखी एक महत्वाकांक्षी योजना राबविण्याचा निर्णय घेतला. सुधारणांचा फायदा हा शहरातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचावा आणि अनेक मूलभूत सोयी-सुविधांपासून वंचित असलेल्या घटकांना न्याय मिळावा या उदात्त भावनेतून झोपडी तिथे नळ ही योजना कार्यान्वित करण्याचा निर्णय आम्ही घेतला हे नम्रपणे नमूद करायलाच हवे.

झोपडी तिथे नळ या योजनेमुळे शहराच्या विविध भागात वसलेल्या झोपडपट्टींमधील गोरगरीब जनतेच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे

झोपडपट्टीधारकांना विम्याचं संरक्षण

शहरांचा चौरंगी विकास हे महापालिकेच्या कामाचे सूत्र आम्ही ठेवले असल्याने केवळ पायाभूत सुधारणांवर भर न देता सामाजिक भावनेतून, सामाजिक जबाबदारी स्वीकारून आम्ही आमची कार्यप्रणाली आरंबिली आहे. या सामाजिक भावनेतून आणि या शहरातील शेवटच्या माणसांपर्यंत विकासाची गंगा पोहोचावी, त्यांची उन्नती आणि विकास व्हावा यासाठी महापालिकेने झोपडपट्टीधारकांना विमा संरक्षण देण्याचा महत्वाकांक्षी निर्णय घेतला. या निर्णयाची अंमलबजावणी सुरू असून ज्या झोपडपट्टीधारकांनी आपला मालमत्ता कर 31 जुलै, 2006 अखेरपर्यंत भरला असेल तर त्यांना या निर्णयाचा लाभ मिळू शकेल. महापालिकेने घेतलेल्या या निर्णयामुळे गोरगरीब, सर्वसामान्य जनतेला मोठा आधार मिळणार आहे.

   
Click to view SHIVSENA website
Our Election Symbol
सामाजिक कार्य
सणोत्सव
सांस्कृतिक
क्रीडा
मुलभूत सुविधा
शैक्षणिक
आरोग्यसंपदा