Shri Rajan Vichare's website. Shivsena - BJP candidate from Thane-148 constituency.
मुखपृष्ठ  |  मनोगत  | पुरस्कार  |  झालेले प्रकल्प  |  महत्त्वाकांक्षी प्रकल्प  |  आव्हाल  |  बातम्या  |  लोकसभेतील कामकाज  |  प्रेरणास्थान  |  संघ्र  |  संपर्क
सॅटीस
ठाणे शहरातील वाहतुकीला कंटाळलेल्या नागरिकांना दिलासा देणारा सॅटीस...
अधिक वाचा
पाणी पुरवठा योजना
अतिरिक्त 110 द.ल.लि. प्रतिदीन पाणी पुरवठा योजना...
अधिक वाचा
मुंबई विद्यापीठाचे उपकेंद्र
बाळकुम येथे मुंबई विद्यापीठाचे उपकेंद्र सुरू करण्यात आले.
अधिक वाचा
 
महानगर पाइप गॅस
ठाणे शहरात महानगर पाइप गॅसचे कनेक्शन
अधिक वाचा
मुंबई विद्यापीठ उपकेंद
मुंबई विद्यापीठ उपकेंद्राचे भूमिपूजन झाले

मुंबई विद्यापीठाचे उपकेंद्र ठाणे शहरामध्ये व्हावे यासाठी महापौरपदाच्या कारकिर्दीत दि.20 फेबुवारी 2007 रोजीच्या सर्वसाधारण सभेत ठराव घेण्यात आला. त्यानंतर सतत दोन वर्षे विद्यापीठाचे उपकेंद्र ठाण्यात होण्यासाठी पाठपुरावा चालू होता. आमदार झाल्यावर पहिल्याच अधिवेशनामध्ये लक्षवेधीद्वारे मुंबई विद्यापीठाचा प्रश्न सभागृहात उपस्थित केला व संपूर्ण सभागृहाचे लक्ष वेधून घेतले. त्यानंतर औचित्याच्या मुद्याद्वारे सभागृहात चर्चा केली. मुंबई विद्यापीठाचे उपकेंद्र ठाण्यात होणे किती गरजेचे आहे हे पटवून दिले.

पुन्हा एकदा पावसाळी अधिवेशनामध्ये तारांकित प्रश्नाद्वारे मुंबई विद्यापीठाचा प्रश्न उपस्थित केला. त्यामुळेच मुंबई विद्यापीठाचे ठाणे येथे उपकेंद्र मंजूर करण्यात आले. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. राजन वेळूकर यांनी ठाणे हे केवळ उपकेंद्र न राहता सर्व कोर्सेससाठी एक मोठे स्वतंत्र कँम्पस व्हावे असा प्रयत्न केला. त्यानुसार मुंबई विद्यापीठाच्या ठाणे उपकेंद्राचा उद्घाटन सोहळा मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला. या उद्घाटनाला उच्च तंत्र शिक्षण मंत्री मा.श्री. राजेश टोपे, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु मा.श्री. राजन वेळूकर उपस्थित होते. इतके होऊनही विद्यापीठ उपकेंद्राच्या प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात होईना. त्यामुळे मा. राज्यपाल के. शंकरनारायण यांची शिवसेना विधिमंडळ गटनेते मा. श्री. सुभाषजी देसाईसाहेब आणि ठाणे जिल्हा संपर्कप्रमुख, जिल्हाप्रमुख, आमदार मा. श्री. एकनाथजी शिंदे साहेब व मीरा - भाईंदर संपर्कप्रमुख, आमदार मा. श्री. प्रतापजी सरनाईक साहेब यांच्यासह भेट घेऊन विद्यापीठ उपकेंद्राचे बांधकाम होत नसल्याची बाब निदर्शनास आणून दिली. विद्यापीठासाठी देण्यात आलेल्या निधीचा देखील वापर इमारतीसाठी न करता संरक्षक भिंतीसाठी वापरण्यात आला. तसेच अधिवेशनामध्ये मांडलेल्या लक्षवेधीला योग्य उत्तर न मिळाल्याने विधिमंडळ द्वितीय अधिवेशन 2013 मध्ये कुलगुरुविरूद्ध हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल करण्यात आला. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या विद्यापीठ प्रशासनाने इमारतीच्या बांधकामाला सुरुवात केली आहे. आणि सन 2014 च्या शैक्षणिक वर्षापासून एमबीए अभ्यासक्रम व लॉ कॉलेज सुरू करण्याचा निर्णयदेखील घेतला आहे.

 
 
 
Click to view SHIVSENA website
Our Election Symbol
सामाजिक कार्य
सणोत्सव
सांस्कृतिक
क्रीडा
मुलभूत सुविधा
शैक्षणिक
आरोग्यसंपदा