Shri Rajan Vichare's website. Shivsena - BJP candidate from Thane-148 constituency.
मुखपृष्ठ  |  मनोगत  | पुरस्कार  |  झालेले प्रकल्प  |  महत्त्वाकांक्षी प्रकल्प  |  आव्हाल  |  बातम्या  |  लोकसभेतील कामकाज  |  प्रेरणास्थान  |  संघ्र  |  संपर्क
सॅटीस
ठाणे शहरातील वाहतुकीला कंटाळलेल्या नागरिकांना दिलासा देणारा सॅटीस...
अधिक वाचा
पाणी पुरवठा योजना
अतिरिक्त 110 द.ल.लि. प्रतिदीन पाणी पुरवठा योजना...
अधिक वाचा
मुंबई विद्यापीठाचे उपकेंद्र
बाळकुम येथे मुंबई विद्यापीठाचे उपकेंद्र सुरू करण्यात आले.
अधिक वाचा
 
महानगर पाइप गॅस
ठाणे शहरात महानगर पाइप गॅसचे कनेक्शन
अधिक वाचा
सॅटीस प्रकल्प
ठाणे रेल्वेस्थानक परिसर वाहतूक सुधारणा योजना
   
   

ठाणे शहरातील वाहतुकीला कंटाळलेल्या नागरिकांना दिलासा देणारा सॅटीस हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प ज्याची गेली 15 वर्षे ठाणेकर नागरिक वाट पाहत आहेत. हा प्रकल्प आता पूर्णत्वास आला असून देशातील असा प्रकल्प राबविणारी ठाणे महानगरपालिका पहिली महापालिका आहे.

प्रस्तावना

ठाणे रेल्वेस्थानक भारतीय उपखंडातील पहिल्या रेल्वेलाईनवरील एक रेल्वेस्थानक असून सध्या ते मध्य रेल्वेच्या ठाणे-कल्याण सेक्शनमधील मोठ्या रेल्वेस्थानकांपैकी एक आहे. जवळपास 6 लक्ष प्रवासी या स्थानकावरून दररोज प्रवास करतात. प्रवाशांची ही संख्या सन 2031 पर्यंत 20.31 लक्ष एवढी होणे अपेक्षित आहे. ठाणे रेल्वेस्थानक भारतातील सर्वात जुने व ब्रिटीशकालीन रेल्वेस्थानक असल्याने स्थानकाच्या परिसरातील भागाचा विकास कोणत्याही नियोजनाशिवाय झालेला आहे. प्रवाशांच्या व वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे या परिसरात असणाऱ्या वाहतूक सुविधांवर प्रचंड ताण पडत असून रेल्वेस्थानक परिसरात सातत्याने वाहतूक कोंडी होत असे.

वाहतूक कोंडीची कारणे

ठाणे रेल्वेस्थानक परिसरातील वाहतूक मुख्यत्वे मिश्र स्वरूपाची आहे.
रेल्वेस्थानक परिसरात एस.टी. व टी.एम.टी. बसेसच्या अवजड वाहनांची वाहतूक टॅक्सीज्, ऑटोरिक्षा, कार, दुचाकी वाहनांच्या स्वरूपात हलक्या वाहनांची वाहतूक व पादचारी यांच्यामुळे एकूण वाहतूक मिश्र स्वरुपाची आहे.
रेल्वेस्थानक परिसरात उपलब्ध असलेली वाहतूक करण्यायोग्य जागा मर्यादित स्वरूपाची आहे. सदरची मर्यादित जागा वाढत्या रहदारीची मागणी पूर्ण करण्यास असमर्थ आहे.

वरील बाबींचा विचार करुन ठाणे रेल्वेस्थानक परिसरात होणाऱ्या वाहतूक कोंडीवर उपया योजना करणेसाठी मा.महासभेने दि.16.06.2004 रोजीच्या सभेत ठाणे रेल्वे स्थानक परिसर वाहतूक सुधारणा योजना राबविण्याच्या प्रकल्पास मा.महापौर श्री.राजन विचारे यांचे अध्यक्षतेखाली एकमताने मान्यता देण्यात आली.

सदर प्रकल्पाची बहुतांशी व्याप्ती रेल्वे स्थानक परिसरात असून मध्य रेल्वेकडे मा.महापौर श्री.राजन विचारे यांनी वेळोवेळी पाठपुरावा केल्याने त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे मध्ये रेल्वेने दि.08.02.2006 रोजी सामंजस्य करारनामा करुन कामास मान्यता दिली.

सदर कामाचा भूमिपूजन सोहळा मा.श्री.उध्दवजी ठाकरे, कार्याध्यक्ष, शिवसेना यांचे शुभहस्ते व श्री.मनोहर जोशी, खासदार - माजी मुख्यमंत्री, महाराष्ट्र शासन व अध्यक्ष लोकसभा, श्री.सुभाषजी देसाई, आमदार-ठाणे जिल्हा संपर्क नेते यांचे प्रमुख उपस्थितीत दि. 3 मार्च 2007 रोजी संपन्न झाला.

 
 
वैशिष्ट्ये
 
 
ठळक वैशिष्ट्ये

सदर योजनेनुसार रेल्वेस्थानक परिसरात पूल व पादचारी मार्गाचे बांधकाम करून पूर्ण वाहतुकीची विभागणी तीन वेगवेगळया स्तरांवर करण्यात येईल.

योजनेच्या पहिल्या भागानुसार रेल्वेस्थानकाच्या दक्षिण व उत्तर दिशेकडील पादचारी पूल अनुक्रमे 225 मी. व 175 मी. वाढवण्यात येतील.

योजनेच्या दुसऱ्या भागानुसार बसेससाठी रेल्वेस्थानक परिसरात कमी उंचीचा डेक बांधण्यात येईल. टी.एम.टी. बसेसचे बस थांबे सदरच्या डेकवर बांधण्यात येतील. सदरच्या बसेस डेकला जोडलेल्या खास बसेससाठी बांधलेल्या पुलावरून रेल्वेस्थानक परिसराबाहेर जातील.

योजनेच्या तिसऱ्या भागानुसार टॅक्सी, ऑटोरिक्षा व कार रेल्वेस्थानक परिसरात जमिनीच्या पातळीवरून प्रवेश करतील व त्याच पातळीवरून रेल्वेस्थानकासमोरून बाहेर जातील.

तसेच रेल्वेचे पादचारी पूल एकमेकांस तसे वर नमूद केलेल्या पुलावरील प्लॅटफॉर्मला जोडण्यात येतील.

सदर योजनेप्रमाणे रेल्वेस्थानक परिसराकडून बाहेर जाणारी बस वाहतूक पूर्णपणे पुलावरुन करण्याचे प्रस्तावित आहे. बस व ऑटोरिक्षाचा वापर करणाऱ्या प्रवाशांना तसेच पादचाऱ्यांना रेल्वेस्थानक परिसरात प्रवेश करणे व बाहेर जाणे सोयीचे झाल्याने येथील वाहतूक सुरळीत होईल.

   
   
   
सॅटीस
 
   
Click to view SHIVSENA website
Our Election Symbol
सामाजिक कार्य
सणोत्सव
सांस्कृतिक
क्रीडा
मुलभूत सुविधा
शैक्षणिक
आरोग्यसंपदा