Shri Rajan Vichare's website. Shivsena - BJP candidate from Thane-148 constituency.
मुखपृष्ठ  |  मनोगत  | पुरस्कार  |  झालेले प्रकल्प  |  महत्त्वाकांक्षी प्रकल्प  |  आव्हाल  |  बातम्या  |  लोकसभेतील कामकाज  |  प्रेरणास्थान  |  संघ्र  |  संपर्क
सॅटीस
ठाणे शहरातील वाहतुकीला कंटाळलेल्या नागरिकांना दिलासा देणारा सॅटीस...
अधिक वाचा
पाणी पुरवठा योजना
अतिरिक्त 110 द.ल.लि. प्रतिदीन पाणी पुरवठा योजना...
अधिक वाचा
मुंबई विद्यापीठाचे उपकेंद्र
बाळकुम येथे मुंबई विद्यापीठाचे उपकेंद्र सुरू करण्यात आले.
अधिक वाचा
 
महानगर पाइप गॅस
ठाणे शहरात महानगर पाइप गॅसचे कनेक्शन
अधिक वाचा
क्रीडा
मॅरेथॉन
 
 
महापौर राजन विचारे यांच्या कारकिर्दीतील एक महत्वाचा क्षण म्हणजे भव्य-दिव्य ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन : पहिल्यांदाच स्थानिक विशेषत: मराठी धावपट्टूंना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी महापौर श्री. राजन विचारे यांनी ही स्पर्धा केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित करण्याचा दूरदर्शी निर्णय घेतला. त्यामुळे महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून अगदी आदिवासी भागातील विद्यार्थ्यांनीही या 'वर्षा मॅरेथॉन' मध्ये आपला उल्लेखनीय असा सहभाग नोंदविला. महिला गट, पुरुष गट या शिवाय पहिल्यांदाच ज्येष्ठ नागरिकांनाही 'पळा पळा कोण पुढे पळे तो'चा आनंद लुटता आला.
 
   
 
देशी खेळांना उत्तेजन
 
   
देशी खेळाच्या प्रसार आणि प्रचाराबराबरच या खेळाला उत्तेजन देण्यासाठी ठाणे महापालिकेतर्फे दरवर्षी महापौर चषक क्रीडा स्पर्धा आयोजित करून अस्सल देशी खेळांना उत्तेजन देण्याबरोबरच तरूण पिढीमध्ये खेळांची आवड निर्माण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. यामध्ये महापौर चषक राष्ट्रीय खोखो स्पर्धा, कबड्डी स्पर्धा, महापौर केसरी कुस्ती स्पर्धा, शरीर सौष्ठव स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. त्याचबरोबर तरूणांमध्ये आंतरराष्ट्रीय खेळांची आवड य्नर्माण व्हावी यासाठी महापौर चषक ज्युनियर मानांकन राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा आदी स्पर्धारंचा समावेश आहे. या सर्व स्पर्धांच्या माध्यमातून एक निकोप तरूण पिढी घडविण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. विशेष म्हणजे आम्ही आयोजित करीत असलेल्या महापौर चषक अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्यावतीने ठाणे महानगरपालिकेचा अमृतकलश देऊन सन्मान करण्यात आला आहे. अशा स्पर्धा आयोजित करणारी ठाणे महापालिका देशातील एकमेव महापालिका आहे.
 
 

बाहेर पडणारा धुवाँधार पाऊस, कोणत्याही क्षणी भगवा झेंडा फडकेल आणि पळण्याच्या सूचना मिळतील या अविर्भावात असलेले हजारो धावपट्टू, शिवसेना कार्याध्यक्ष मा.उद्धव ठाकरे यांनी भगवा फडकविला आणि हजारो धावपट्टूंनी पायात जीव आणून धावायला सुरुवात केली, विजयाच्या आशेने. विविध गटात अंदाजे 40 हजार महिला, पुरुष, तरुण, तरुणींनी या मॅरेथॉनमध्ये सहभाग नोंदवून या स्पर्धेच्या यशाचा झेंडा अटकेपार लावला.

तमाम ठाणेकरांसाठी अनोखा ठरलेल्या या सोहळयासाठी संपूर्ण शहर भगव्या पताकांनी सजविण्यात आले होते. ठिकठिकाणी उभारण्यात आलेले स्वागताचे फलक नजरा वेधून घेत होते. डीजेच्या तालावर अबालवृद्ध ताल धरीत होते आणि महापौर श्री. राजन विचारे यांच्या यशस्वी आयोजनाचा एक एक क्षण ठाणेकरांना आणि धावपट्टूंना धावण्याची ऊर्जा देत होता. एक अपूर्व असा सोहळा म्हणून ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन ठाणेकरांच्या हृदयात स्थान करून राहील यात शंकाच नाही.

   
Click to view SHIVSENA website
Our Election Symbol
सामाजिक कार्य
सणोत्सव
सांस्कृतिक
क्रीडा
मुलभूत सुविधा
शैक्षणिक
आरोग्यसंपदा