Shri Rajan Vichare's website. Shivsena - BJP candidate from Thane-148 constituency.
मुखपृष्ठ  |  मनोगत  | पुरस्कार  |  झालेले प्रकल्प  |  महत्त्वाकांक्षी प्रकल्प  |  आव्हाल  |  बातम्या  |  लोकसभेतील कामकाज  |  प्रेरणास्थान  |  संघ्र  |  संपर्क
सॅटीस
ठाणे शहरातील वाहतुकीला कंटाळलेल्या नागरिकांना दिलासा देणारा सॅटीस...
अधिक वाचा
पाणी पुरवठा योजना
अतिरिक्त 110 द.ल.लि. प्रतिदीन पाणी पुरवठा योजना...
अधिक वाचा
मुंबई विद्यापीठाचे उपकेंद्र
बाळकुम येथे मुंबई विद्यापीठाचे उपकेंद्र सुरू करण्यात आले.
अधिक वाचा
 
महानगर पाइप गॅस
ठाणे शहरात महानगर पाइप गॅसचे कनेक्शन
अधिक वाचा
भारताची आर्थिक राजधानी म्हणविल्या जाणाऱया मुंबई शहरालगत असलेले ठाणे हे खूप प्राचीन शहर आहे. ठाण्यास आध्यात्मिक व सांस्कृतिक महत्त्वही तेवढेच आहे. ठाणे ही राज्याची सांस्कृतिक उपराजधानी देखील मानली जात आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे ठाणे शहरावर विशेष प्रेम होते. या प्रेमापोटीच शिवसेना आणि ठाणे हे अतूट असे नाते निर्माण झाले आहे. ठाणे शहरातील बांधवांनी मला शहराचा विकास करण्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून सातत्याने निवडून दिले व मला ठाणे शहराच्या विकासामध्ये हातभार लावण्याची संधी मिळाली हे मी माझे भाग्य समजतो.

ठाणे शहराचा आमदार या नात्याने आतापर्यंत केलेल्या कामाचा कार्यअहवाल सादर करताना मला अतिशय आनंद होत आहे. निवडणुकीपूर्वी कार्यपूर्तीच्या आश्वासनांपैकी जवळ जवळ सर्वच कामे आजच्या घडीला पूर्ण झालेली आपल्या नजरेस आली असतील. ही कामे करताना मला वेळोवेळी मार्गदर्शन करणारे हिंदुस्थानचे स्फूर्तिस्थान हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे तसेच शिवसेना कार्याध्यक्ष आदरणीय श्री. उद्धवजी ठाकरे साहेब, आपल्या सर्वांचे लाडके धर्मवीर आनंद दिघे साहेब, शिवसेना विधिमंडळ पक्षनेते मा. श्री. सुभाष देसाई, खासदार मा.श्री. संजयजी राऊत, खासदार शिवसेना सचिव मा. श्री. अनिलजी देसाई , आमदार शिवसेना सचिव मा. श्री. विनायकजी राऊत, ठाणे जिल्हा संपर्कप्रमुख, जिल्हाप्रमुख आमदार मा. श्री. एकनाथ शिंदे, शिवसेना उपनेते श्री. अनंत तरे, माजी खासदार कै. प्रकाश परांजपे साहेब, कल्याण डोंबिवली लोकसभा क्षेत्रप्रमुख गोपाळ लांडगे,, उप जिल्हाप्रमुख श्री. नरेश म्हस्के, ठाणे शहरप्रमुख श्री. रमेश वैती, माजी जिल्हाप्रमुख श्री. रघुनाथ मोरे, महिला आघाडी प्रमुख श्रीमती अनिताताई बिर्जे, गटनेते, प्रभाग समिती सभापती इतर सर्व समित्यांचे सभापती, नगरसेवक, नगरसेविका, विरोधी पक्षनेते, महानगरपालिकेचे सर्व विभागांचे संबंधित अधिकारी व कर्मचारी, मा. पोलिस आयुक्त व त्यांचे सहकारी, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे अधिकारी, व त्यांचे सहकारी, महानगर टेलिफोन निगमचे अधिकारी व सहकारी, महानगर गॅसचे अधिकारी व सहकारी, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे अधिकारी व त्यांचे सहकारी, महानगर टेलिफोन निगमचे अधिकारी व सहकारी, वेळोवेळी सूचना व मार्गदर्शन करणारे विभागातील ज्येष्ठ नागरिक, सर्व सार्वजनिक मंडळे, विभागातील सर्व व्यापारी व हितचिंतक, वकील, वास्तुवशारद, डॉक्टर्स, इंजिनिअर्स, शाळांचे मुख्याध्यापक, माझ्याबरोबर सातत्याने काम करणारे शहरप्रमुख, उपशहरप्रमुख, विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, गटप्रमुख तसेच सर्व शिवसैनिक, नेहमी आमच्या चांगल्या कार्याला प्रोत्साहन व प्रसिद्धी देणारे आमच्या सर्व पत्रकार बंधूंच्या बहुमोल सहकार्यामुळेच व आपल्यासारख्या जनता जनार्दनाचा पाठिंबा, आशीर्वाद व सहकार्याने माझी यशस्वी वाटचाल सुरू आहे. विधिमंडळ कामकाजाबरोबर समाजसेवा करीत असताना, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, कला व क्रीडा क्षेत्र तसेच गरजू बांधवांच्या आर्थिक समस्या इत्यादी क्षेत्रात मी आपल्या सहकार्याने सातत्याने कार्यरत आहे. तसेच निरपेक्ष, मेहनती, कर्तव्यतत्पर, कार्यक्षम, सहकारी शिवसैनिक व शिवसेनेचे सन्माननीय पदाधिकारी यांच्या सहकार्यामुळे मी ही कामे करू शकलो याची मला पूर्ण जाणीव आहे. या सर्वांचा मी अत्यंत ऋणी आहे व मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो.

यापुढेही आपल्या सेवेत, मग दिवस असो अथवा रात्र, मी कधीही मागे राहणार नाही. आजपर्यंतच्या माझ्या महापौरपदाच्या व नगरसेवक कार्यकालाच्या कार्य अहवालाचे आपण निश्चित स्वागत कराल व त्या निमित्ताने आपणाकडून ज्या सूचना आय्ण तक्रारी येतील त्यांचे स्वागत व य्नराकरण करण्याचा प्रयत्न मी भविष्यातही सदैव करीत राहीन अशी मी आपणास ग्वाही देतो.

Click to view SHIVSENA website
Our Election Symbol
सामाजिक कार्य
सणोत्सव
सांस्कृतिक
क्रीडा
मुलभूत सुविधा
शैक्षणिक
आरोग्यसंपदा