Shri Rajan Vichare's website. Shivsena - BJP candidate from Thane-148 constituency.
मुखपृष्ठ  |  मनोगत  | पुरस्कार  |  झालेले प्रकल्प  |  महत्त्वाकांक्षी प्रकल्प  |  आव्हाल  |  बातम्या  |  लोकसभेतील कामकाज  |  प्रेरणास्थान  |  संघ्र  |  संपर्क
सॅटीस
ठाणे शहरातील वाहतुकीला कंटाळलेल्या नागरिकांना दिलासा देणारा सॅटीस...
अधिक वाचा
पाणी पुरवठा योजना
अतिरिक्त 110 द.ल.लि. प्रतिदीन पाणी पुरवठा योजना...
अधिक वाचा
मुंबई विद्यापीठाचे उपकेंद्र
बाळकुम येथे मुंबई विद्यापीठाचे उपकेंद्र सुरू करण्यात आले.
अधिक वाचा
 
महानगर पाइप गॅस
ठाणे शहरात महानगर पाइप गॅसचे कनेक्शन
अधिक वाचा
आरोग्यसंपदा
गोरगरीब आणि सर्वसामान्य लोकांना उत्तम प्रतीच्या विविध प्रकारच्या प्रतिबंधात्मक व उपचारात्मक आरोग्य सुविधा देता याव्यात यासाठी महापालिकेच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालय सुरू करण्यात आले. 14 बाह्य रूग्ण विभाग आणि 17 आंतररूग्ण विभाग कार्यरत आहेत.

500 खाटांची क्षमता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालयाची स्वत:ची रक्तपेढी, क्ष किरण चाचणी, विकृतिशास्त्र चाचणी व सूक्ष्मजीवशास्त्र चाचण्यांसाठी स्वतंत्र विभाग कार्यरत आहेत. रूग्णालयामध्ये स्वतंत्र आठ शस्त्रक्रियागृहे आहेत.

रूग्णसेवेंतर्गत वैद्यकीय शल्यचिकित्सा, अलस्थव्यंग चिकित्सा, दंतचिकित्सा, नेत्रचिकित्सा, स्त्री रोग व प्रसुतिशास्त्र चिकित्सा, मानसोपचार चिकित्सा, कान, नाक, घसा चिकित्सा, त्वचारोग चिकित्सा आणि कुटुंबकल्याण कार्यक्रम अशा विविध सेवा रूग्णालयामध्ये उपलब्ध करून देण्यात आल्याने गोरगरीब लोकांच्यादृष्टीने हे रूग्णालय एक संजीवनी ठरले आहे.

 
 

महापालिकेच्या रूग्णालयाच्या माध्यमातून या सुविधा देण्याबरोबरच काही विशेष सुविधांसाठी ठाणेकर नागरिकांना मुंबईला धावावे लागायचे. बहुतांशी गोरगरीब रूग्णांना मुंबईची ही विशेष सुविधा खर्चाच्या दृष्टिकोनातून आवाक्याबाहेरची होती. त्यांची ही समस्या लक्षात घेऊन आम्ही महापालिकेच्या छत्रपती शिवाजी रूग्णालयामध्ये विशेष सुविधा देण्याच्या कामाला प्राधान्य दिले. आणि सर्वसामान्य ठाणेकर नागरिकांना नाममात्र दरात विशेष आरोग्य सुविधा पुरविण्याच्या दृष्टिकोनातून अशंत: खाजगी सहभागातून सीटी स्कॅन सुविधा आणि गरजू रूग्णांना वाजवी दरात डायलेसीस सुविधा उपलब्ध करून दिली. यामुळे सर्वसामान्य लोकांचा सीटी स्कॅनसाठी मुंबईला जाण्यासाठी लागणारा वेळ आणि पैशातही मोठ्या प्रमाणात बचत झाली आहे. या सुविधा उपलब्ध करून आम्ही आरोग्य सुविधांना प्राधान्य देण्याचा नेहमीच प्रयत्न केला आहे.

   
Click to view SHIVSENA website
Our Election Symbol
सामाजिक कार्य
सणोत्सव
सांस्कृतिक
क्रीडा
मुलभूत सुविधा
शैक्षणिक
आरोग्यसंपदा