Shri Rajan Vichare's website. Shivsena - BJP candidate from Thane-148 constituency.
मुखपृष्ठ  |  मनोगत  | पुरस्कार  |  झालेले प्रकल्प  |  महत्त्वाकांक्षी प्रकल्प  |  आव्हाल  |  बातम्या  |  लोकसभेतील कामकाज  |  प्रेरणास्थान  |  संघ्र  |  संपर्क
सॅटीस
ठाणे शहरातील वाहतुकीला कंटाळलेल्या नागरिकांना दिलासा देणारा सॅटीस...
अधिक वाचा
पाणी पुरवठा योजना
अतिरिक्त 110 द.ल.लि. प्रतिदीन पाणी पुरवठा योजना...
अधिक वाचा
मुंबई विद्यापीठाचे उपकेंद्र
बाळकुम येथे मुंबई विद्यापीठाचे उपकेंद्र सुरू करण्यात आले.
अधिक वाचा
 
महानगर पाइप गॅस
ठाणे शहरात महानगर पाइप गॅसचे कनेक्शन
अधिक वाचा
सणोत्सव
 
दही हंडी हा हिंदू संस्कृतीमधील एक महत्त्वाचा उत्सव. 'गोविंदा रे गोपाळा' म्हणत शेकडो लोक हा उत्सव तन-मन-धन अर्पण करून साजरा करतात. पण या दही हंडीला लाखमोलाचं महत्त्व प्राप्त करून देण्यासाठी आणि स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे यांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी जांभळी नाक्यावर या वर्षी प्रथमच महापौर राजन विचारे यांच्या नेतृत्वाखाली लाखमोलाची दहीहंडी उभी राहिली. जिचा महिमा भारतभर झालाच पण जगभरातही पोहोचला. महिला आणि पुरूष गटासाठी वेगवेगळया असलेली ही दहीहंडी संपूर्ण ठाणेकरांचं आकर्षण बनली होती. हजारो अबालवृद्धांनी या लाखमोलाच्या दहीहंडीचा मनमुराद आनंद लुटला. शिवसेना कार्याध्यक्ष मा.उद्धव ठाकरे, शिवसेना नेते व ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख मा. आमदार सुभाष देसाई आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलेला हा सोहळा चिरंतन स्मरणात राहील असाच होता.
 
   
 

पुरुष गोविंदा पथकांची चढाई : जांभळी नाक्यावरील या लाखमोलाच्या दहीहंडीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मुंबईसह महाराष्ट्रातून अनेक पुरुष गोविंदा पथके आपले इप्सिप्त साध्य करण्यासाठी जमले होते. क्षणाक्षणाला उत्कंठा, भीती, उत्साह अंगात सळसळत होता. या दहीहंडीचे थेट प्रक्षेपण सहयाद्री आणि सहारा मुंबई या वृत्तवाहिन्यांवरून होत असल्याने संपूर्ण भारतभर या विक्रमी दहीहंडीचा आनंद घरबसल्या सर्वार्नी लुटला.

अजिंक्य महिला : ताल धरायला लावणारा डी.जे., आकर्षक विद्युत रोषणाईच्या झगमगाटात आणि 'गोविंदा रे गोपाळा'च्या कल्लोळात जांभळी नाक्यावरील उभारण्यात आलेली महिला गटासाठीची दहीहंडी डोळयाचे पारणे फेडणारी होती. ही दहीहंडी फोडण्यासाठी मुंबईतील अनेक गोविंदा पथके ठाण्यात डेरेदाखल झाली होती.

 
 
   
   
Click to view SHIVSENA website
Our Election Symbol