Shri Rajan Vichare's website. Shivsena - BJP candidate from Thane-148 constituency.
मुखपृष्ठ  |  मनोगत  | पुरस्कार  |  झालेले प्रकल्प  |  महत्त्वाकांक्षी प्रकल्प  |  आव्हाल  |  बातम्या  |  लोकसभेतील कामकाज  |  प्रेरणास्थान  |  संघ्र  |  संपर्क
सॅटीस
ठाणे शहरातील वाहतुकीला कंटाळलेल्या नागरिकांना दिलासा देणारा सॅटीस...
अधिक वाचा
पाणी पुरवठा योजना
अतिरिक्त 110 द.ल.लि. प्रतिदीन पाणी पुरवठा योजना...
अधिक वाचा
मुंबई विद्यापीठाचे उपकेंद्र
बाळकुम येथे मुंबई विद्यापीठाचे उपकेंद्र सुरू करण्यात आले.
अधिक वाचा
 
महानगर पाइप गॅस
ठाणे शहरात महानगर पाइप गॅसचे कनेक्शन
अधिक वाचा
शैक्षणिक

अन्न, वस्त्र, निवारा हा जसा प्रत्येक व्यक्तीचा मूलभूत अधिकार आहे त्याचप्रमाणे शिक्षण हा प्रत्येक बालकाचा मूलभूत हक्क आहे हे सूत्र मानून 14 वर्षांखालील प्रत्येक मुलाला मोफत शिक्षण देण्याच्या शासनाच्या धोरणाचा अंगिकार करून ठाणे महापालिकेच्या शिक्षण य्वभागाने शह्रातील गोरगरीब, तळागाळातील व आर्थिकदृष्ट्या दुर्वल विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची ह्मी घेतली. महापालिका प्राथमिक शिक्षणाचा हा वसा गेली 42 वर्षे अखंडपणे चालवित आहे.

शिक्षण हे समाजाच्या उन्नतीचे महत्वचे माध्यम आहे हे समजून महापालिकेने मराठी, हिंदी, गुजराती आणि उर्दू माध्यमाच्या एकूण 127 शाळा सुरू केल्या. ज्यामधून आज 50 हरांपेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी संगणक प्रशिक्षण, क्रीडा प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना मोफत गणवेश, शैक्षणिक साहित्य, पौष्टिक आहार योजनाही राबविण्यात येतात.

 

समाजातील गोरगरीब विद्यार्थ्यांना इंग्रजी शिक्षण घेता यावे यासाठी महापालिकेने इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू केली. शिक्षण मंडळाच्यावतीने संस्कृत पाठशाला, सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना स्काऊट गाईड चळवळ, विज्ञान प्रदर्शन आदी शैक्षणिक उपक्रमांबरोबरच सांस्कृतिक उपक्रमही राबविले जातात.

प्राथमिक शिक्षणाबरोबरच महापालिकेने माध्यमिक शिक्षणाची सुविधाही उपलब्ध करून दिली आहे. महापालिकेच्या 7 माध्यमिक शाळांमधून अंदाजे 4500 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. थोडक्यात शिक्षणाची गंगा प्रत्येकापर्यंत पोहोचावी यासाठी नेह्मीच आमचा प्रयत्न राहिलेला आहे.

एवढेच नाही तर सामाजिक बांधिलकीतून महापालिकेने अपंग, मय्तमंद मुलांसाठी स्व. धर्मवीर आनंद दिघे जिद्द शाळा स्थापन करून त्यांच्या शिक्षणाचा प्रश्न सोडविला. केवळ शाळा स्थापन करून आम्ही ही जबाबदारी झटकली नाही तर त्या शाळेची मुले राष्ट्रीय स्तरावर कशी चमकतील यासाठी आम्ही विशेष प्रयत्न करीत आहोत. या शाळेला सर्व सुविधा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

त्याचबरोबर मराठी तरूण भारतीय प्रशासन सेवेमध्ये यावेत यासाठी खास कै. चिंतामणराव देशमुख आय. ए. एस. प्रशिक्षण केंद्र स्थापन करून गोरगरीब मराठी तरूणांचा भारतीय प्रशासन सेवेचा मार्ग सुकर केला. कै. माँसाहेब मीनाताई ठाकरे परिचारिका प्रशिक्षण केंद्र सुरू करून सर्वसामान्य कुटुंबातील तरूणींना नोकरी मिळवून देण्याचा दिलासा दिला.

 
 
 
धर्मवीर कै.आनंद दिघे जिद्द शाळा - आम्ही चालवू हा पुढे वारसा...
 
 

ठाणे शहराची सांस्कृतिक परंपरा समृद्ध करतानाच महापालिकेने धर्मवीर आनंद दिघे जिद्द शाळेच्या माध्यमातून सामाजिक वसाही जपण्याचा प्रयत्न केला आहे. समाजातील अलस्थव्यंग आणि मतिमंद विद्यार्थ्यांच्या जिद्दीला शिक्षणाची साथ देऊन महापालिकेने त्यांच्या जीवनात आशेचा किरण दाखविला आहे. अशा पद्धतीची स्वतंत्र विशेष शाळा चालविणारी ही महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील एकमेव महापालिका आहे.

ज्या मुलांचा बुध्यांक 70 पेक्षा कमी आणि शारीरिक अपंगत्व 60'क्के पेक्षा जास्त आहे अशा विद्यार्थ्यांना या जिद्द शाळेमध्ये प्रवेश दिला जातो. आज मितीस या शाळेमध्ये अलस्थव्यंग आणि मतिमंद या दोन्ही विभागाच मिळून 105 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

धर्मवीर आनंद दिघे जिद्द शाळेमध्ये अलस्थव्यंग, मतिमंद विद्यार्थ्यांना उपयोगी असे झोपाळे, बॅलन्सबॉल, घसरगुंडी, सॅन्ड पी' आणि सुसज्ज गार्डन अशा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. शैक्षणिक गुणवत्ता सिद्ध करतानाच जिद्दच्या विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक, क्रीडा, विज्ञान स्पर्धेमध्ये नावलौय्कक मिळविला आहे. स्पेशल ऑलम्पिक स्पर्धेमध्येही जिद्द शाळेच्या विद्यार्थ्यांनी सुवर्णपदकासह अनेक बक्षिसांची लयलूट केली. अलीकडेच जिद्द शाळेची विद्यार्थी कु. मनाली कुलकर्णी हिला देशातील बेस्ट क्रिएटिव्ह चाईल्ड या राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या निमित्ताने जिद्द शाळेच्या जिद्दीची कहाणी राष्ट्रीय स्तरावरही पोहोचली आहे.

जिद्द शाळेच्या कर्तृत्त्वाची भरारी एवढ्यावरच थांबली आहे असे नाही तर शाळेने ' जिद्द ' या फिल्मचे राज्यभर प्रक्षेपण केले, संकल्प या चित्रपटाच्या चित्रिकरणात शाळेतील विद्यार्थ्यांनी महत्वपूर्ण सहभाग घेतला, अपंग एकात्म शिक्षण मोहिमेंतर्गत अपंग पुनर्वास परिषदेकडून शाळेची प्रशिक्षण केंद्रासाठी निवड आदी अनेक आघाड्यांवर जिद्द शाळेने आपल्या जिद्दीचे दर्शन घडविले आहे.

ठाणे महानगरपालिकेच्या या सामाजिक उपक्रमाला शहरामधील अनेक स्वयंसेवी संस्था तेवढ्याच कृतज्ञतेने मदत करून हा सामाजिक वसा पुढे चालविण्याच्या कामी महत्वपूर्ण मदत करीत आहेत.

   
Click to view SHIVSENA website
Our Election Symbol
सामाजिक कार्य
सणोत्सव
सांस्कृतिक
क्रीडा
मुलभूत सुविधा
शैक्षणिक
आरोग्यसंपदा