Shri Rajan Vichare's website. Shivsena - BJP candidate from Thane-148 constituency.
मुखपृष्ठ  |  मनोगत  | पुरस्कार  |  झालेले प्रकल्प  |  महत्त्वाकांक्षी प्रकल्प  |  आव्हाल  |  बातम्या  |  लोकसभेतील कामकाज  |  प्रेरणास्थान  |  संघ्र  |  संपर्क
सॅटीस
ठाणे शहरातील वाहतुकीला कंटाळलेल्या नागरिकांना दिलासा देणारा सॅटीस...
अधिक वाचा
पाणी पुरवठा योजना
अतिरिक्त 110 द.ल.लि. प्रतिदीन पाणी पुरवठा योजना...
अधिक वाचा
मुंबई विद्यापीठाचे उपकेंद्र
बाळकुम येथे मुंबई विद्यापीठाचे उपकेंद्र सुरू करण्यात आले.
अधिक वाचा
 
महानगर पाइप गॅस
ठाणे शहरात महानगर पाइप गॅसचे कनेक्शन
अधिक वाचा
सांस्कृतिक
         
 
ठाणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक उपराजधानी मानली जाते. साहित्य, संस्कृती, नृत्य, नाट्य, क्रीडा आदी कलांचा सुरेख संगम या शहराने साधला आहे. महाराष्ट्राचे कलाविध समृद्ध करण्यासाठी अनेक कलाकरांनी आपलं योगदान दिलं आहे.
या सर्वांच्या योगदानाचा परमोच्च बिंदू ठरला तो मासुंदा तलावाच्या काठावर आणि दादोजी कोंडदेव क्रीडा प्रेक्षागृहामध्ये पार पडलेला दोन दिवसांचा सांस्कृतिक जल्लोष म्हणजेच ठाणे फेस्टिव्हल. महापौर राजन विचारे यांच्या यशस्वी आयोजनाचा सर्वांगसुंदर क्षण. जो क्षण ठाणेकरांनी अनुभवला, जागविला.
 
   
 

मराठी-हिंदी चित्रपट सृष्टीतले मातब्बर, संगीत क्षेत्रातील अग्रणी अशा कलाकारांनी सजविलेला हा फेस्टिव्हल ठाण्याच्या समृद्ध अशा सांस्कृतिक परंपरेचा पुढच्या पिढीला प्रेरणा देणारा असाच होता. प्रख्यात गायक पं. सुरेश वाडकर, रवींद्र साठे, अजित कडकडे, राहुल वैद्य यांनी मासुंदा तलाव येथील संगीत मैफलीत छेडलेले सप्तसूर ठाणेकरांना तृप्त करीत होते. तर दादोजी कोंडदेव क्रीडा प्रेक्षागृह येथे हजारो ठाणेकर रसिकांच्या साक्षीने पार पडलेला 'सोनू निगम नाईट' हा कार्यक्रम रसिकांच्यादृष्टीने परमोच्च असा ठरला. सर्वांगाला झिंग आणणारी सोनू निगम यांची सुपरहिट गाणी आणि सुनिल पाल यांचे हास्याचे धबधबे यामध्ये ठाणेकर अक्षरश: न्हाऊन निघाले.

शिवसेना कार्याध्यक्ष मा. उद्धव ठाकरे, शिवसेना नेते मा.खासदार मनोहर जोशी, विधानपरिषद उपसभापती मा.वसंत डावखरे, शिवसेना नेते व ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख आमदार मा.सुभाष देसाई, शिवसेना सचिव व आमदार मा.विनायक राऊत, शिवसेना नेते खासदार मा.संजय राऊत, शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख व आमदार मा.एकनाथ शिंदे, शिवसेना उपनेते मा.अनंत तरे, शिवसेना ठाणे जिल्हा उपप्रमुख गोपाळ लांडगे, नरेश म्हस्के आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा फेस्टिव्हल म्हणजे महाराष्ट्राचा सांस्कृतिक जल्लोशच होता.

 
एक प्रगत औद्योगिक जिल्हा म्हणून ठाणे परिचित असले तरी या शहराचा चौकोनी विकास करताना इथली सांस्कृतिक परंपरा जोपासण्याचा आणि ती अधिक समृद्ध करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही केला आहे. बाल मनातील सुप्त गुणांना आकार देण्यासाठी चित्रकला स्पर्धा, त्यांच्या कलेला व्यासपीठ मिळावे म्हणून बालनाट्य महोत्सव, ठाणे शहराचे भूषण असलेले ठाण्याचे माजी नगराध्यक्ष आणि जनकवी पी. सावळाराम यांच्या स्मृति प्रित्यर्थ स्मृति समारोह, तरूणांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी एकांकिका स्पर्धा, लोककलेचा वारसा पुढल्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी लोककला महोत्सव, नारळी पौर्णिमा उत्सव, पं. राम मराठे संगीत महोत्सव आदी महोत्सवांच्या माध्यमातून हा वारसा अधिक समृद्ध करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही केला आहे. ठाणे फेस्टिव्हलच्या निमित्ताने तर ठाणे शहराचे सांस्कृतिक महत्व अधिक उजळून निघाले आहे. इथून पुढच्या काळातही हा वारसा समृद्ध करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे.
 
   
 
Click to view SHIVSENA website
Our Election Symbol
सामाजिक कार्य
सणोत्सव
सांस्कृतिक
क्रीडा
मुलभूत सुविधा
शैक्षणिक
आरोग्यसंपदा