इ. स. २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत ठाणे, मीरा भाईंदर, नवी मुंबई मतदार संघातून निवडणूक लढविण्यासाठी शिवसेना-भाजपा-रिपार्ड (ए)-शिवसंग्राम-रासप महायुतीचा उमेदवार म्हणून माझी निवड केली होती, हे माझे सद् भाग्यचं. माझी निवड केल्याबद्दल शिवसेनेचे पक्षप्रमुख श्री. उध्दवजी ठाकरे, ठाण्याचे शिवसेनेचे संपर्क प्रमुर्व आणि पालकमंत्री मा. श्री. एकनाथजी शिंदे साहेब, शिवसेनेचे सर्व नेते, उपनेते व पदाधिकारी, भाजपाचे रिपार्डचे सर्व संबंधित नेते यांचा मी सदैव क्रणी आहे. मी ज्याच्यामुळे निवडून येऊ शकलो त्या सर्वांचा मी आयुष्यभर क्रणी राहीन.
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने, पक्षप्रमुख मा.श्री. उद्धवजी ठाकरे, युवानेते श्री.आदित्यजी ठाकरे, शिवसेनेचे नेते व उपनेते, विविध पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाने, प्रोत्साहनाने आणि हार्दिक सहकार्याने, मला खासदारपद लाभल्यावर गेली पाच वर्षे अहोरात्र समाजसेवेच्या निष्ठेने नागरिकांच्या समस्यांचा अभ्यास करून त्या सोडविण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला. जात-पात-धर्म यांचा विचार न करता सर्वांच्या सहकार्याने कार्य केले. पत्रव्यवहार करून समस्या पूर्तीसाठी पंतप्रधान, केंद्रीय मंत्री, प्रशासन, राज्याचे मुख्यमंत्री, संबंधित खात्याचे मंत्री, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, महानगरपालिकेचे आयुक्त, नगरसेवक, प्रशासकीय अधिकारी, उद्योजक, वर्कील, डॉक्टर, इंजिनीअर, सीए, आर्किटेक्ट, साहित्यीक, पत्रकार, कलावंत, क्रीडापटू, सर्वसामान्य मतदार इत्यादींच्या गाठीभेटी घेतल्या, चर्चा केल्या. ठाणे जिल्ह्यातील सर्व खासदार व आमदार यांचेही सहकार्य लाभले. सातत्याने पाठपुरावा करून काही समस्या सुटल्या, काही उपक्रम उभे राहिले. काही प्रश्न मार्गी लागले. सर्वांच्या सहकार्याने हे घडले. माझ्या कुटुंबीयांचे सहकार्यही मोठेच होते. मी फक्त निमित्तमात्र होतो. साधू-संतांचे आशीर्वाद, थोरांच्या शुभेच्छा पाठिशी होत्या. त्यांच्यामुळेच माझ्या हातून काही घडू शकले असे मला प्रामाणिक व नम्रपणे नमूद करावेसे वाटते. संत तुकाराम महाराज यांच्या शब्दात “मी तो भारवाही” असे मला म्हणावेसे वाटते.
माझ्या पाच वर्षांच्या खासदारकीच्या काळात मी केलेल्या कार्याचा तपशील छायाचित्रांच्या व त्यासोबत या मजकुरांद्वारे देण्याचा प्रयत्न प्रस्तुत अहवालातून केला आहे. हा अहवाल वाचून आपण मला आपला अभिप्राय कळविल्यास आणि काही सूचना केल्यास भविष्यात कार्यरत राहताना मला त्या उपयुक्त ठरतील आणि त्याबद्दल मी आपला सदैव क्रणी राहीन. आपल्या शुभेच्छा आणि आशीर्वाद माझ्या पाठिशी असतीलच याचा मला ठाम विश्वास आहे.